Pankaja Munde : भाजप जगातला सर्वात माेठा पक्ष, ठाकरे बंधू एकत्र आल्याने फरक पडणार नाही, पंकजा मुंडे यांचे मत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Pankaja Munde राज्यात सध्या उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. हे दाेघे बंधू एकत्र आल्याने राजकारणावर काय परिणाम हाेणार याचीही चर्चा हाेत आहे. भारतीय जनता पक्षावर याचा काय परिणाम यावरही अंदाज व्यक्त केले जात आहे. मात्र, भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, असे मत पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.Pankaja Munde

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात शिवसेना-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने ही चर्चा वाढली. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही. देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आहे. राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला अडचण येईल असं मला वाटत नाही. ते दोघेही मोठे नेते आहेत. काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची मंत्री नितेश राणेंनी तुळजापुरात खिल्ली उडवली. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत, आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली. तसेच हिंदुत्त्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा टोला नितेश राणे यांनी ठाकरेंना लगावला.

BJP is the biggest party in the world, Thackeray brothers coming together won’t make a difference, says Pankaja Munde

महत्वाच्या बातम्या