Chandrashekhar Bawankule तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसने दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे, अशी जोरदार टीका महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली आहे. Chandrashekhar Bawankule

ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता. भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्याने, पाकिस्तानने आपली माणसे त्या ठिकाणाहून हटवली, असे धक्कादायक विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना त्यांनी केलेल्या विधानावरून जोरदार हल्लाबोल केला. Chandrashekhar Bawankule

बावनकुळेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असे संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते पटोले यांनी केले आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे.

नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचे शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारतमाते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधींही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात.” असे बावनकुळेंनी म्हटले आहे.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवला होता. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील एकूण 9 दहशतवादी तळांना भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केले. पण हे ऑपरेशन सिंदूर लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम होता, असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

Your mind and brain have been corrupted, Chandrashekhar Bawankule strongly attacks Nana Patole

महत्वाच्या बातम्या