Vishwesh Kumar : एअर इंडिया विमान अपघातात मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या विश्वेश कुमारचा थरारक अनुभव

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : Vishwesh Kumar भारतात सुट्टीसाठी आलेल्या मूळ भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेल्या विश्वेश कुमार रमेश (वय ४०) अहमदाबाद अपघातातून बचावले आहेत. विमानाच्या ११अ सीटवर बसलेले रमेश हे एकमेव बचावले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वतःहून घटनास्थळावरून बाहेर पडताना दिसतो.Vishwesh Kumar

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेलं एअर इंडिया विमान (AI-171) गुरुवारी दुपारी 1.38 वाजता टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच मेघाणी नगर परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानाने पेट घेतला आणि परिसरात हाहाकार माजला. या दुर्घटनेत सुमारे २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, आणि मृतांचा आकडा अजूनही निश्चित झालेला नाही.

अपघातात ब्रिटनमधील रहिवासी विश्वेश कुमार रमेश (वय ४०) यांनी थोडक्यात जीव वाचवला. सध्या ते अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल, असारवा येथील जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या छातीत, डोळ्यांमध्ये आणि पायांमध्ये गंभीर मार लागला आहे.टेकऑफ झाल्यानंतर फक्त तीस सेकंद झाले होते आणि अचानक मोठा आवाज आला. त्यानंतर विमान कोसळलं. काही कळायच्या आत सगळं घडलं,” असं सांगताना विश्वेश हादरलेले दिसत होते. ते म्हणाले, अपघातानंतर त्यांना रडारड ऐकू येत होती आणि सर्वत्र मृतदेह विखुरलेले दिसत होते.जेव्हा मी भानावर आलो, तेव्हा आजूबाजूला केवळ मृतदेह होते. मी घाबरलो होतो. ताबडतोब उठून धाव घेतली. विमानाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. कोणीतरी मला पकडून अॅम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि रुग्णालयात आणलं.

लंडनमध्ये राहणाऱ्या विश्वेश कुमारचा जन्म भारतात झाला असून ते गेल्या २० वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांची पत्नी व मुलगाही लंडनमध्येच राहतात. ते भारतात काही दिवसांसाठी सुट्टीसाठी आले होते आणि त्यांचे मोठे बंधू अजय कुमार रमेश (वय ४५) यांच्यासोबत पुन्हा लंडनला परतत होते.

आम्ही काही दिवसांपूर्वी दीवला भेट दिली होती. अजय वेगळ्या सीटवर बसले होते. पण अपघातानंतर ते कुठे आहेत, याची अजिबात कल्पना नाही. कृपया त्यांचा शोध घ्या,” अशी विनवणी त्यांनी केली.

दरम्यान, अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत आणि जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी झालेली आहे. अनेक जण आपल्या आप्तस्वकीयांचा शोध घेत असताना रडत, धावत, डोकं हातात धरून बेशुद्ध होतानाही दिसत होते.

माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याबाबतही अनिश्चितता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांचा शोध घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. रूपाणी यांचे माजी सहाय्यक शैलेश मंडल्या यांनी “आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. काही माहिती मिळाली तर कृपया कळवा,” असं सांगितलं.

एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त विमानात २३० प्रवासी होते. यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते.

विमानाचा प्रकार बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एअर इंडिया व नागरी उड्डाण मंत्रालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

The thrilling experience of Vishwesh Kumar, who narrowly escaped death in the Air India plane crash

महत्वाच्या बातम्या