Bachchu Kadu : बच्चू कडू यांची प्रकृती खालावली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

तिवसा : सर्वसामान्यांचे सरकार असे संबोधन महायुतीचे सरकार नेहमी करते. मग बच्चू कडू (Bachchu Kadu) हे वेगळ्या लोकांसाठी आंदोलन करीत आहेत काय? त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत काय? कर्जमाफीच्या आश्वासनावर चर्चा का करीत नाही? बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati )यांनी दिला.


कृषी कर्जमाफीसह १७ मुख्य मागण्यांसाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष नेते बच्चू कडू यांनी गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे बेमुदत अन्नत्याग उपोषण ८ जूनपासून सुरू केले. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारने लवकरात लवकर हा विषय सोडवला पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे होते. त्यांचा वंशज म्हणून राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हे घराणे उभे आहे, हा संदेश देण्यासाठी मी गुरुकुंजात आलो आहे असे सांगून संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महाराष्ट्रातील संयमी, कष्टाळू शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा पंजाबसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होईल. त्यांनी आंदोलन स्थळाहूनच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट मोबाइलवर संपर्क साधत झापले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करताना संभाजीराजे म्हणाले, कोट घालून फिरणाऱ्या कृषिमंत्र्यांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधला होता, असे सांगितले. ही वेळ फोनवरून बोलण्याची नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची आहे.

 

If Bachchu Kadu’s health deteriorates, the whole of Maharashtra will catch fire, warns Sambhajiraje Chhatrapati

महत्वाच्या बातम्या