आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता, अजित पवारांनी बच्चू कडू यांना सुनावले

विशेष प्रतिनिधी

पुणे : आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता आहे. बच्चू कडू यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आता राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकारच्या वतीने करू असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. सरकार अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही. असे म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांना समजावताना अजित पवार म्हणाले, कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यावेळी बावनकुळे यांनी स्वतः त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आता राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकारच्या वतीने करू.

गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. काही वेळ पोलीस आणि कार्यकर्यांमध्ये झटपट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजितदादांचा कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न अचानक कार्यक्रम सुरु असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यानी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

We are also concerned about farmers, Ajit Pawar told Bachchu Kadu

महत्वाच्या बातम्या