Bachchu Kadu, : आता आरपारची लढाई,बच्चू कडू यांच्या बरोबरच राजू शेट्टी यांचाही इशारा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : Bachchu Kadu प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपोषण आंदोलन मागे घेताना 2 ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.Bachchu Kadu

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच कर्ज गोठवा आणि नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा करा. कर्जमुक्ती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे.लाडकी बहिण योजना जाहीर करताना कोणता अभ्यास केला होता? सिंचन घोटाळ्याच्या गाडीभर फाईल दिल्या, तेव्हा त्यातून काय निष्पन्न झालं? अनेक घोटाळे तुमच्या कडे पाठविले, मात्र तुमचा अभ्यास कधी दिसलाच नाही. अभ्यास करून दिलेल्या कर्जमुक्तीचं काय वाटोळं झालं तेही जगाला माहिती आहे.

राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करु असं सांगितलं. त्यावेळी कोणता अभ्यास केला होता? तुम्ही किती हजार कोटींची कर्जमुक्ती देणार आहात, त्याचा आकडा जाहीर करा. तुम्ही रक्कमेचा आकडा सांगा, त्यात कसे शेतकरी बसवायचे, आम्ही सांगू. वेळकाढूपणा करणार असल्यास आम्हाला मान्य नाही, आता आरपारची लढाई आहे.

दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. राजू शेट्टी यांनी कडू यांची भेट घेतली. ते म्हणाले, राज्यामध्ये दररोज ८ शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत यामुळे महाराष्ट्र राज्य शेतक-यांची स्मशानभुमी झाली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पाळावे. राज्यातील मंत्री जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांच्या गाड्या अडवून याबाबत त्यांना जाब विचारण्याचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे, असे शेट्टी म्हणाले होते.

Now the battle is on, along with Bachchu Kadu, Raju Shetty also warns

महत्वाच्या बातम्या