Devendra Fadnavis : बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis : बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

जळगाव : मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत. जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचे नाव पुसून टाकणार आहोत. भाजपचे नामोनिशाण पुसून टाकू, असे आरोप करणाऱ्या उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच वाक्यात सुनावले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनी भाजपसह महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंनी टीका करताना म्हणाले की, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्धव ठाकरेंच्या टीकेबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले की, “बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही.” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 20) जळगाव दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. जळगाव दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस हे एकनाथ खडसे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यावरून त्यांना विचारले असता ते म्हणाले की, खडसेंच्या भेटीबाबत मला माहिती नाही.

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. “आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे. या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. या ठिकाणी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग होता. याआधी मी याच स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आलो होतो. आता त्याच्या उद्घाटनासाठी येण्याची संधी मला मिळाली. मला त्याचा आनंद आहे,” असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.

I don’t reply to those who are like Bolbachchan Bhairavi, Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023