विशेष प्रतिनिधी
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशात हिंदुत्ववादी नेते म्हणून आदरणीय होते, मात्र त्यांचाच मुलगा मतांसाठी दाढ्या कुरवाळतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. बाळासाहेबांसारख्या तेजस्वी नेत्याच्या पोटी उद्धव ठाकरेसारखा मुलगा जन्माला यावा ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे,” असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
पडळकर म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांच्याकडे लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ असायची. मात्र आज त्यांच्या घरी कोणी फिरकत नाही. अशावेळी त्यांनी भाजपावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनीही त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नये.”
संजय राऊतांना सुनावताना पडळकर म्हणाले की, संजय राऊत हे अडचणीत आहेत. त्यांना काही पूजा करायची असेल, तर त्यांनी मला सांगावे. संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल, तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो. संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी. पूजा करणे गरजेचे आहे. त्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून आपण पूजा करू, संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील, त्या ठिकाणी पूजा करतो.
लँड जिहाद करणाऱ्याना धडा शिकवा असे आवाहन पडळकर यांनी केले. जिल्हाधिकारी,आयुक्त, सीईओ यांनी तत्काळ आपापल्या परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त करावे, अशी मागणी केली.
लव्ह जिहाद बंद करण्यासाठी आई-वडिलांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे, मुलींना, महिलांना ब्लॅकमेलिंग करून फसवले जाते. पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई वेळीच करावी. धर्मांतरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ठोकून काढा. धर्मांतर विरोधी कायदा वेळीच झाला पाहिजे. वाकड्या नरजेने पहाणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, असे आवाहन पडळकर यांनी केले.
It is unfortunate that a son like Uddhav Thackeray should be born to Balasaheb Thackeray, says Gopichand Padalkar
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी