विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शापच मिळणार. खरं तर बाळासाहेबांच्या मुलाला हिंदुत्वाचं काम करणारे लोक खटकणारच, असा प्रतिहल्ला भाजपचे नेते आणि मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. Uddhav Thackeray
शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उंची पेंग्विनची अशी टीका नितेश राणे यांच्यावर केली होती. त्यावर हल्लाबोल करताना नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, म्हणून त्यांना बोलतो. त्यांनी विचार सोडले म्हणून त्यांना आता ठाकरे ब्रँडची चिंता आहे. परंतु स्वतःचा मुलगा कसा आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला पेंग्विन म्हटल्याने मला काही फरक पडत नाही. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मुलाची अवस्था बघावी. Uddhav Thackeray
नितेश राणे म्हणाले की, दिनो मोरिया आणि दिशा सालियानबद्दल आम्ही माहिती देत आहोत, त्यामुळे आमच्यावर त्यांच्याकडून टीका केली जाते. परंतु त्यांनी जर स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असत, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. तसेच आदित्य ठाकरे यांचा आवाज न बाईचा न माणसाचा. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा बाप सिल्वर ओक की जन पथला हेच त्यांना माहीत नाही. वरळी सांभाळता आली नाही आणि आता आमदारकीला काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का? आदित्य ठाकरेला निवडणुकीसाठी तुम्ही अधिकृत जाहीर करा, मग आम्ही महापौर जाहीर करतो, असे आवाहनही राणे यांनी केले.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची त्यांना लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदूहृदयसम्राट बोलण्याची तरी त्यांनी हिंमत करायला हवी होती. पण त्यांच्यात हिंमत नाही, त्यामुळे उबाठा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे होता. खरं तर उद्धव ठाकरे राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उदाहरण आहेत. हम दो हमारे दो एवढंच त्यांनी केलं. त्यामुळे माझ्यावरील टीकेवरून उद्धव ठाकरेंची बौद्धिक पातळी कळते. कारण राज्याच्या हितासाठी ते कधीही भांडले नाहीत. त्यांच्यात कौटुंबिक भांडणं होती. आता एकाकडे शून्य आमदार आणि एकाकडे 20 आमदार असल्यावर काय होणार? असे म्हणत नितेश राणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवरही भाष्य केलं.
He opposed people working for Hindutva , Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला
- Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा
- Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसा
- Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, नारायण राणे यांची चिरंजीव नितेश राणे यांना समज