विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे? असा सवाल कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. Manikrao Kokate
गेल्या काही दिवसांपासून कोकाटे हे त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्याने त्यांच्यावर चांगलेच टीकेचे मोहोळ उठले होते. अजित पवारांनीही त्यांना सुनावले होते. आता पुन्हा त्यांनी महायुतीच्या समीकरणात वादग्रस्त विधान केले आहे. कोकाटे म्हणाले की, “इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे?”,असे वक्तव्य त्यांनी केले आहे. माणिकराव
यापूर्वीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरून वक्तव्ये केली होती. पुढील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा अजित पवार यांनी सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून करावी, अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठल चरणी केली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अमोल मिटकरी म्हणाले होते की, आम्ही पांडुरंगाला एकच साकडे घातले की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल.
पण, पुढील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील अशीच इच्छा व्यक्त केली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचे गिरीश महाजन , शिंदे गटाचे दादा भुसे आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांचे देखील नाव या पदासाठी अनेक दिवसांपासून चर्चेत असताना अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून फार वाद नाहीत. पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Manikrao Kokate said, we also think Ajitdada should become the Chief Minister.
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी