Sanjay Raut संजय राऊतच पहिल्यांदा फुटणार होते, गुलाबराव पाटील यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल असाच दावा केला होता. त्यामुळे संजय राऊत यांच्याबाबतच संशय निर्माण झाला आहे.
संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू दररोज माध्यमांतून मांडतात. शिंदे गटाच्या नेत्यांवर कठोर शब्दांत टीका करतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. त्यांनीच शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, ते त्यावेळेस थांबले, असा दावा पाटील यांनी शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी देखील संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे त्यांना येता आले नाही. यामुळेच राऊत आजही चिडचिड करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात, असे म्हटले होते.

2022 मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. मात्र त्यानंतर संजय राऊत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या आमदारांवर तुटून पडत आहेत..

Sanjay Raut was the first to break out, claims Gulabrao Patil

महत्वाच्या बातम्या