विशेष प्रतिनिधी
लखनऊ : Mirzapur ‘ मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये उत्तर प्रदेशात अवैध शस्त्रे तयार कधी होतात याची झलक पाहायला मिळाली होती. त्याची आठवण ताजी झाली आहे. आता लखनऊच्या मलीहाबाद ( मिर्झागंज) परिसरात पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरावर छाप्यात टाकत ३०० हून अधिक बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, ५०,००० काडतुसे आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त केले. हे शस्त्रसाठे हकीम सलाहुद्दीन उर्फ लाला याच्या घरी आढळले. तो पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर राहतो.Mirzapur
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मलिहाबाद, रहीमाबाद आणि मॉल पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तरित्या गुरुवारी उशिरा छापा टाकला. घरातून पूर्ण बनलेली आणि अर्धवट बनवलेली शस्त्रे, २० पोती भरलेली काडतुसे, बंदुका, माउझर, पिस्तुल यांसारखी अवैध शस्त्रे आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले.
या घरात केवळ शस्त्रास्त्रच नव्हे तर प्राण्यांची कातडी आणि संरक्षित प्रजातींचे अवशेषही आढळले, त्यामुळे वन्यजीव तस्करीच्या संशयासही अधिक बळकटी मिळाली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वनविभागाच्या सहभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
हकीम सलाहुद्दीन पूर्वी मलीहाबाद पोस्ट ऑफिसजवळ डॉक्टरांचे क्लिनिक चालवत होता. त्याची पत्नी सरकारी शिक्षिका असून, एक मुलगी नॉर्वेमध्ये शिक्षण घेत आहे आणि दुसरी बी.टेक करत आहे. तोअनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशभर बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या घरात चालणारी शस्त्रनिर्मिती फॅक्टरी केवळ पोलिस ठाण्याच्या शेजारी असूनही कोणीही संशय घेतला नव्हता. एवढेच नव्हे तर पोलिसांनाही याचा सुगावा नव्हता. ही बाब उघड झाल्यावर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. एडीसीपी जितेंद्र दुबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष कार्यबल (STF) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे.
पोलिसांनी परिसरात २० मीटरपर्यंत बंदोबस्त वाढवला आहे, तर घरातील इतर सदस्य सलाहुद्दीन यांची पत्नी, मुलगी आणि एक तरुण ओवैस यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून, सलाहुद्दीनच्या संपर्कातील इतर सहकार्यांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईने केवळ अवैध शस्त्रे संभाव्य धार्मिक किंवा सांप्रदायिक उद्देशांसाठी वापराचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
Remembering ‘Mirzapur’, three hundred guns found in doctor’s illegal arms factory in Mirzaganj
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal : गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? काँग्रेसचा सवाल
- Ashish Shelar काँग्रेसने आणले त्रिभाषा सूत्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मान्यता, आशिष शेलार यांचा दावा
- filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
- Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात