विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा इशारा शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भरलेल्या ताटाचे विचारता पण जनतेच्या मतांची माती कोणी केली, देवेंद्र फडणवीसांच्या पाठित खंजीर कोणी खुपसला?मराठी माणूस, मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. पालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल जो काही अपप्रचार होतो, तो सगळ्यांना अवगत झालाय. मराठीचं प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही. जन्मलो मराठी, मराठीसाठीच जगणार आणि मराठीसाठीच खपणार.
मराठी माणूस तुमच्या फेक नरेटिव्हला आता फसणार नाही. कारण तुमच्या तोंडी ‘म’ म्हणजे महापालिकेचा, ‘म’ मलिद्याचा, ‘म’ मतलबाचा आणि ‘म’ मतांचा आहे आणि तुमच्या मनात फक्त मतांचे राजकारण आहे, अशी टीका करत शिंदे म्हणाले , माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा मी बोलतो. आरोपांना आरोपाने नाही तर कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. फेसबुकवाले सामोरे जाऊ शकत नाही म्हणून सकाळ दुपार व संध्याकाळ माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका करण्यापूर्वी तुमच्याकडे तीन बोटं आहेत त्याचा विचार करा.
राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले, इतक्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही. ज्यांना कस्पटासमान समजले, संपलेले लोक असल्याचे हिणवले मात्र त्यांच्याच मागे रोज जावे लागतंय, चल मेरे भाई तेरे हाथ जोडतां हू,
मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं महापौरपद केवळ आपल्या विनंतीमुळे शिवसेनेला बहाल केले गेले असे सांगून शिंदे म्हणाले या घटनेला आमदार मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत. भाजपाने महापौरपदाची तयार केली होती, मात्र आपण देवेंद्र फडणवीसांना विनंती केली की, महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या, त्यांनी अर्धा तासांत विचार करून पत्रकार परिषद घेत महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं. मात्र 2019 मध्ये दगा, धोका आणि विश्वासघात करून तुम्ही त्याची परतफेड केली. एक तू राहशील नाहीतर मी, अशी टोकाची भाषा त्यांनी केली. त्यामुळेच त्यांचा कार्यक्रम करावा लागला.
I don’t tease anyone, but if they tease me, I won’t leave, Eknath Shinde warns
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला