विशेष प्रतिनिधी
मुंबई : जरा संभलकर करीये आँरोसे हमारी बुराई, आप जिन्हे जाकर बताते है, वही हमे आकर बताते है! जहां जिसका दाना होता है, समय उसे वहां बुलाता है, कोई किसीका दिया नहीं खाता, इन्सान अपने नसीब का खाता हैं Eknath Shinde
वो समंदर खंगालने मे लगे हुए है, हमारी कमियां निकालने लगे हुए है जिनकी लंगोटिया फटी हुई है, वो हमारी पगडी उछालने मे लगे हुए है
अशी शेरोशायरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणे मारले होते. याच टोमण्यांवर पलटवार करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदी सक्तीचा आदेश काढला होता. आता याच सक्तीच्या विरोधात म्हणजे आपल्याच निर्णयाच्या विरुद्ध त्यांनी मोर्चा काढणे हे दुर्दैवी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या की यांना मराठीची आठवण होते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार असल्याचा कांगावा करतात. तसेच मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्यानंतर अपप्रचार सुरू करतात. तुमचे मराठीवर प्रेम नसून म म्हणजे मतलब आणि मलिदा असा आहे.
आमदारांना माहीत होते की आम्ही गुहाटीला गेल्यानंतर एकीकडे आपण मलाही फोन करत होतात आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही फोन करत होतात. अशी दुटप्पी भूमिका आमदारांना माहीत झाली होती. एक चेहरे पे कही चेहरे लगाते है लोग, अशी आपली ओळख झाल्यामुळे निवडणुकीत लोकांनी तुम्हाला जागा दाखवली. मनात एक पोटात एक तुम्ही राजकारणातले बहुरूपी आहात. मी कधी सत्तेसाठी लाचार झालो नाही शिवसेना वाढवण्याचेच काम करणार आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही, हे खरे आहे. पण आम्ही सोन्याचा घास भरवणारे लोक आहोत. आम्ही कधी कोणाच्या घराचे वासे मोजले नाहीत. सत्तेचे ताट गेल्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात.
शिंदे म्हणाले, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला ४० ते ५० फोन केले पण एकही फोन तुम्ही उचलला नाही. आणि आता तुम्ही संपलेल्या लोकांमागे जात आहात. चल मेरे भाई तेरे हात जोडता है अशी तुमची अवस्था झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना आपण गळ घातल्यामुळेच शिवसेनेला मुंबईचे महापौरपद मिळाले असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
राजकारणात एक तर तू राहील नाहीतर मी राहील, असा आपण फडणवीस यांना इशारा दिला होता. परंतु आता फडवणीस मुख्यमंत्री आहेत. भाजपासोबत युती करून सत्तेत या, असे माझे म्हणणे ऐकले नाही म्हणूनच मी टांगा पलटी आणि घोडे फरार केले. आता शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, ही तुमची अजुनही पोटदुखी आहे. पण माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तीन बोटे तुमच्याकडे आहेत, हे आपण ध्यानात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
जळी-स्थळी काष्ठी पाषाणी मी दिसत आहे तीन वर्षांपासून रोज शिव्या शाप, आरोप, मत्सर एकच कॅसेट रोज ऐकतोय. पद येतात जातात पण एकनाथ शिंदेला अडीच कोटी महिलांचा भाऊ ही उपाधी मिळाली. आम्ही गुवाहाटीला असताना निरोप यायचे, दुसरीकडून दिल्लीत संधान साधायचे की यांना घेऊ नका, आम्ही येतो हे चालले होते. आम्ही सत्ता सोडून गेलो, मी छेडत नाही पण मला छेडले तर मी सोडत नाही. सत्ता आणि खुर्चीसाठी अनेकांनी तडजोड केली, मी करणार नाही असे सांगत बहोत धोया मैंने आंखों को, फिर चश्मे को भी साफ किया तब समझा के कीचड आंखों मे नहीं, सामनेवाले किरदारोंपर ही है असा शेर बोलून शिंदे यांनी सुनावला.
Eknath Shinde’s taunt to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला