विशेष प्रतिनिधी
मुंबई : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना सहआरोपी का केले नाही असा सवाल करत विधिमंडळाच्या महिला, बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीने तपासातअनेक त्रुटी असल्याचे ताशेरे पोलिसांवर ओढले आहेत.
जालिंदर सुपेकर यांची सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची आवश्यकता आहे. सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यावर रुखवताच्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी चौकशी करून त्यांना सुद्धा सहआरोपी करण्यात यावे, असेही अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप तपासादम्यान समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासापासून सुपेकर यांनी दूर ठेवावे असा अहवालात म्हटलं आहे. सुपेकरांची एक ध्वनीफित प्रसारीत झाली आहे. तिची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) विभागाकडून तपासणी करून सुपेकरांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना सहआरोपी करावं, असं अहवालात नमूद करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
अहवालामध्ये आत्महत्या दिसत असली तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. विधिमंडळाच्या महिला व बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे.
समितीकडून सरकारला व्यवस्थेमधील त्रुटी दूर करण्यासाठी विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. वैष्णवीला पती आणि सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण, छळ, जाच होत असल्याचे आणि हुंड्याच्या माध्यमातून ब्रॅण्डेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम विविध वस्तू घेतल्याचे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तातडीने तपास पूर्ण करून आरोपी आणि सहआरोपींविरोधात पुरावे सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सुद्धा अहवालात म्हटलं आहे
Vaishnavi Hagavane suicide: Why wasn’t IPS Jalindar Supekar made a co-accused? Legislative committee slams police
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला