विशेष प्रतिनिधी
सातारा: सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून आमदारांना हाणामारी व सभागृहात गोंधळ करून अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सत्तास्थान मिळवून देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Shashikant Shinde
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर शशिकांत शिंदे प्रथमच साताऱ्यात आले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विरोधी पक्षाकडून अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांसह सरकारच्या कामकाजातील उणीवा जनतेच्या मनातील रोष जगजाहीर होऊ नये म्हणून सभागृहात व सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या सदस्यांना मारहाण करण्यात आली. सभागृहात मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यात आला. विरोधकांना दमदाटी करून त्यांचा आवाज दाबून सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी हाणून पाडला. सरकारच्या कामात खूप उणिवा आहेत. सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये कोणताही समनव्य नाही. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून मतदारसंघासह सर्वत्र अन्याय दादागिरी करत सत्ताधारी आमदार मतदारसंघात अनेक अनधिकृत कामे करत आहेत. सगळीकडे नुसती बजबजपुरी सुरु आहे. एकूणच सरकार नाकर्ते झाले आहे.
कोणत्याही परिस्थितीत राज्यात त्रिभाषा सूत्र अंमलात आणू दिले जाणार नाही. हिंदी भाषेला विरोध कायम राहील असे सांगून शिंदे म्हणाले, इतर राज्ये त्यांच्या भाषेला प्राधान्य व संरक्षण देत असताना हे राज्यकर्ते मराठी भाषा संपवायला निघाले आहेत. इथे उद्योग धंदे, रोजगार करण्यासाठी आलेले हिंदी भाषिक आणि परप्रांतीय मराठी माणसावर दादागिरी, अन्याय आणि अपमान करत आहेत. दिल्लीकरांच्या भीतीने सरकार त्यांना समज देत नाही, उलट त्यांना संरक्षण देत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत ही हिंदी भाषिकांची दादागिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस आणि महाराष्ट्र पेटून उठला तर सरकारला पळता भुई थोडी होईल, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून लढविल्या जातील. त्या त्या ठिकाणी अधिकार दिले जातील. आवश्यकता असल्यास स्वबळावर निवडणूक लढविली जाईल. सातारा जिल्ह्यात पक्षाची मोठी पिछेहाट झाल्याचे मान्य करून शिंदे यांनी स्थानिक तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून जुन्या नव्यांचा मेळ घालून पक्ष संघटना उभी केली जाईल. आवश्यक त्या ठिकाणी मोठे फेरबदल केले जाते असे शिंदे यांनी सांगितले.
Shashikant Shinde alleges that the ruling party is trying to wrap up the session by creating chaos in the House.
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार