विशेष प्रतिनिधी
मुंबई : आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. Aditya Thackeray
शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये 3 तास होते. यादरम्यान दोघांमध्ये सुमारे 1 तास भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. आता यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्यामध्ये कोणतीही भेट झाली नसल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री हॉटेलमध्ये उपस्थित होते, परंतु त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली नाही. मुख्यमंत्री दुसऱ्या काही कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आले होते, तर आदित्य त्यांच्या मित्रांसह जेवणासाठी हॉटेलमध्ये उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीच्या चर्चांवर आदित्य म्हणाले, मी माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी आणि एक संगीत कार्यक्रम होता त्यासाठी आलो होतो. मी कार्यक्रमात असतानाही या बातम्या पाहत होतो. या बातम्या पाहून एक व्यक्ती आता गावाला जाईल असं वाटतंय. चाललंय ते चालू द्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असतात तेव्हा ते गावाला जातात, अशी टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते. हाच संदर्भ आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत बोलताना म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात. मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की, हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्या दोघांची भेट योगायोगाने झाली. दोन्ही नेते समोरासमोर आले तर अभिवादन करणे, नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे फार स्वाभाविक आहे. लगेचच सुतावरून स्वर्ग गाठणे हे योग्य नाही.
Now a person will go to the village after watching the news, Aditya Thackeray’s attack on Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार