विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. राज ठाकरे काहीही बोलत नाही. मुंबईत 12 टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असा निशाणा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी साधला आहे.
तसेच मुंबईतील सावली बार प्रकरणावर रामदास कदम यांनी भाष्य केलं. ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोटी माहिती दिली. रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डान्सबार कधीही चालवले नाही. आम्ही लोकांचे संसार उद्धवस्त केले नाही, तर आम्ही लोकांचे संसार वाचवले. आमचं डान्सबार असल्याचं सांगत अनिल परब विधानसभेत खोटी माहिती देतायत. मी त्यांचा निषेध करतो, असंही रामदास कदम यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. यावर बोलताना कदम म्हणाले, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष, असं आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय. दिल्लीत हॉटेल लीलामध्ये काय काय झालं, हे उद्धव ठाकरेंना विचारा. मला सगळं माहितीय, मीही सांगेन.
उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला धोंडा म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नको नको ते म्हणायचं आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पाया पडत मला वाचवा. माझ्या मुलाला दिशा सालियन प्रकरणातून वाचवा, असं म्हणायचं, अशी टीका त्यांनी केली.
मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसते. आम्हाला भाजपमध्ये घ्या…आमची तयारी आहे. एकनाथ शिंदेंचं राजकारण संपवा, म्हणजे मी भाजपमध्ये येतो, अशा अटी आणि शर्ती टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून सुरु आहे, असा दावाही रामदास कदम यांनी केला. , असा टोलाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Uddhav Thackeray stands with a begging bowl, Ramdas Kadam targets him for his alliance with Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार