Eknath Khadse : हनीट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, एकनाथ खडसे यांची मागणी

Eknath Khadse : हनीट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, एकनाथ खडसे यांची मागणी

Eknath Khadse

विशेष प्रतिनिधी

जळगाव : Eknath Khadse जळगावच्या प्रफुल्ल लोढा नामक कार्यकर्त्याकडे हनीट्रॅपची संपूर्ण माहिती आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.Eknath Khadse

राज्यात सध्या हनीट्रॅपच्या कथित प्रकरणामुळे राजकीय व प्रशासकीय गोटात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी काही आजी-माजी मंत्री तथा उच्चपदस्थ अधिकारी अडकल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीला हनीट्रॅपची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या कालखंडात अनेक ठिकाणी हनीट्रॅपची प्रकरणे उजेडात येत आहेत. नाशिक येथील एक प्रकरणही नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात 72 अधिकारी अडकल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुर आहे.Eknath Khadse

दुसरे प्रकरण प्रफुल्ल लोढा नामक जळगावच्या माणसाचे आहे. हा व्यक्ती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्याविरोधात अंधेरी व साकिनाका या 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा हा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, त्यांना छळणे, ब्लॅकमेल करण्याचा आहे. तर दुसरा गुन्हा हा हनीट्रॅपचा आहे. प्रफुल्ल लोढा हा पूर्वी एक सामान्य कार्यकर्ता होता. अगोदर तो काँग्रेसमध्ये होता. नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. नंतर त्याने भाजपत प्रवेश केला. त्याच्या प्रवेश सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री कार्यालयाचे रामेश्वर नाईकही उपस्थित होते.

प्रफुल्ल लोढा, गिरीश महाजन व रामेश्वर नाईक या तिघांचे पूर्वी खूप चांगले संबंध होते. पण गतवर्षी लोढाने रामेश्वर नाईक व गिरीश महाजन यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली. त्यांचे चांगले संबंध अचानक का खराब झाले? असा सवाल उपस्थित होतो. याच प्रफुल्ल लोढाने एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत त्याने, एक बटण दाबले की, संपूर्ण देशात हाहाकार माजेल. पण मी कुणाला तरी आई व वहिनी बोललो आहे, असे म्हटले होते, असे खडसे म्हणाले.

या प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडिओ आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असेही एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले.

संजय राऊत यांनी प्रफुल्ल लोढाचा एक फोटो ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही, असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या. त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे ते म्हणालेत. या प्रकरणात 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेंव्हा) याच ट्रॅपमुळे पळाले, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

Eknath Khadse demands SIT probe into honeytrap case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023