Girish Mahajan : एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, गिरीश महाजन यांचा पलटवार

Girish Mahajan : एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, गिरीश महाजन यांचा पलटवार

Girish Mahajan

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Girish Mahajan  मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो, असा पलटवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.Girish Mahajan

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल लोढा यांचा सोबतचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोची सीबीआय चौकशी व्हावी, दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे.Girish Mahajan

महाजन म्हणाले, काही वर्षापूर्वी व्हिडिओ बघितले होते प्रफुल्ल लोढा अत्यंत खालच्या भाषेत एकनाथ खडसे यांना बोलताना दिसत आहे. त्याला काय म्हणावे? कोणत्याही प्रकरणात खडसे माझा संबंध जोडून माझी बदनामी करतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, पण मी खालच्या पातळीवर जाणार नाही. प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली आहे, त्याची चौकशी पोलिस करतील. जे सत्य आहे ते समोर येईलच.

गिरीश महाजन म्हणाले, प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. तो अनेक पक्षात होता. शरद पवार, जयंत पाटील, अजित दादा पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबत प्रफुल्ल लोढा यांचे फोटो आहेत, असे म्हणत त्यांनी मोबाईलमध्ये प्रफुल्ल लोढा याच्यासोबत नेत्यांचे असलेले फोटो दाखवले. मग उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा पण हनीट्रॅपशी संबंध आहे का? या सर्वांची पण सीबीआय आणि एसआयटी चौकशी करायची का? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढाने गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, यासाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी केली आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, एकनाथ खडसे हे प्रफुल्ल लोढाच्या एसआयटी चौकशीची मागणी करत आहेत, पण काही वर्षापूर्वी लोढा याने खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशी मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला, त्यावेळी मी खडसे यांच्या सोबत होतो, मग त्या प्रकरणाची आता चौकशी करायची का? असा पलटवार महाजन यांनी केला.

Eknath Khadse’s head has been affected, Girish Mahajan’s counterattack

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023