Rahul Gandhi : राहुल गांधींचे हवेतच बाण, मतचोरीच्या आरोपांवर सात दिवसांची मुदत संपूनही सादर केले नाही शपथपत्र

Rahul Gandhi : राहुल गांधींचे हवेतच बाण, मतचोरीच्या आरोपांवर सात दिवसांची मुदत संपूनही सादर केले नाही शपथपत्र

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी जनतेला फसवण्यासाठी “मत चोर, गद्दी छोड” असे स्वस्त नारे देत फिरत आहेत. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवर बोट ठेवून त्यांनी जनतेत संभ्रम पसरवण्याचा डाव रचला. मात्र या आरोपांवर शपथपत्र देण्यासाठी निवडणूक आयोगाने सात दिवसांचे दिलेली मुदत संपूनही त्यांनी शपथपत्र दिले नाही. त्यामुळे हे आरोप म्हणजे हवेतच बाण होते हे स्पष्ट झाले आहे. Rahul Gandhi

१७ ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना ठणकावून सांगितले होते की सात दिवसांत शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा. तिसरा पर्याय नाही.” २५ ऑगस्टपर्यंतची मुदत उलटून गेली, पण राहुल गांधींनी ना शपथपत्र दिले ना माफी मागितली. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की राहुल गांधींचे मत चोरीचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. त्यावर पुढील कोणतीही कारवाई होणार नाही.” Rahul Gandhi



मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी थेट इशारा दिला होता. ते म्हणाले, मतचोरी सारखे आरोप करणे म्हणजे जनतेला चुकीच्या मार्गावर नेणे आणि संविधानाचा अपमान आहे. सात दिवसांत शपथपत्र नाही दिले तर आरोप आधारहीन मानले जातील.”

त्यांनी हेही सांगितले की निवडणुकीत पराभूत उमेदवारांना ४५ दिवसांत संबंधित उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. मात्र काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाने त्यावेळी तक्रार केली नाही. निकालानंतर अचानक मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करण्यामागे राजकीय हेतूच दिसतात.

बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष तीव्र पुनरावलोकन मोहिमेत (SIR) निवडणूक आयोगाने ७.२४ कोटी मतदारांपैकी ६५ लाख मृत, स्थलांतरित किंवा दुप्पट नावे ओळखली आहेत. लोकांना १ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार असून अंतिम यादी ३० सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

आयोगाचे म्हणणे आहे की, हा उपक्रम खरे मतदार सुरक्षित ठेवतो, फसवी नावे काढून टाकतो आणि लोकशाही मजबूत करतो. पण काँग्रेस-राजद महाआघाडी या उपक्रमाला विरोध करत आहे कारण मोठ्या प्रमाणावर बनावट मतदार हेच त्यांच्या पाठिशी आहेत. या तपासात परराज्यीय व परदेशी नागरिक (बांगलादेशींसह) भारतीय कागदपत्रांच्या आधारे बिहारमध्ये राहत असल्याचेही उघड झाले.

Rahul Gandhi’s Claims Miss the Mark

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023