विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : तुम्ही स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असे वादग्रस्त विधान प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. कडू म्हणाले की सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. Bachchu Kadu
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार बच्चू कडू म्हणाले, अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक. तुम्ही विचारांची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं. हप्ते वसूल केले की झालं. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा. त्याला लाथ तरी मारता येते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपवली.
शेतकरी नेते शरद जोशी तुमच्यासाठी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून लढले, असे सांगून बच्चू कडू म्हणाले, शेतकरी नेते शरद जोशी यांनी जीवाचे रान केले. त्यांना हिंगणघाटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. राजू शेट्टींना पाडले, मला पाडले, शेतकऱ्यांना जात बघून पाडण्यात आले, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वाव पंडीताला जातीमुळे पाडले, नाक घासून माफी मागितली पाहिजे अशी आमची व्यवस्था आहे.
काही दिवसांपुर्वी सरकराच्या विरोधात बच्चू कडू नागपूरात आंदोलनासाठी बसले होते. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची समजूत काढली होती, त्यानंतरल त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
“Cut Down an MLA Rather Than Commit Suicide,” Bachchu Kadu’s Controversial Remark Sparks Outrage
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा