विशेष प्रतिनिधी
मुंबई : इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिला आहे. Uddhav Thackeray
नाशिकच्या भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही सर्वजण एका चांगल्या दिवशी आला आहेत. आज नरक चतुर्दशी आहे. आज नरकासुराचा वध झाला. आत्ता हा नरकासुर कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलात. आता हा प्रवास सुरू झाला आहे.
आजपर्यंत जे मतचोरी करून तिकडे बसले होते, त्यांना वाटले होते की, त्यांची चोरी कुणी पकडू शकणार नाही. पण त्यांची चोरी चोरासकट आपण पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी माणसांसोबत अमराठी माणसेही एकत्र आली आहेत. एकत्र येत आहेत. देशात कुणालाही हुकूमशाही नको आहे. आपला महाराष्ट्र नेहमी लढणारा आहे. आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात.
पण तुम्हाला काही खोकेबिके मिळालेत का? हे सांगा. काही धाकदपटशहा आहे का? तुमच्या मागे काही एजन्सी लागली आहे का? काही नाही. शेवटी लालुच दाखवून घेतलेली माणसे आणि घाबरून पक्षांतर करणाऱ्या नेभळट माणसांपेक्षा हे कट्टर निष्ठावंत लोक शिवसेनेत येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पापाचे धनी होण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, मी भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की, आपण काय करत आहात आणि कोणते विषय पोसत आहात याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा. इतिहासात आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच दिवाळीच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा व विनंती करत आहे. यावर जास्त बोलण्याची गरज नाही.
नाशिकमध्ये मी एकदा आलो होतो. आता मी तिकडे पुन्हा येईन. पण येईन तेव्हा मी भगवा फडकवूनच येईन. हा भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आरोग्य देवो ही प्रार्थना करतो, तुमचे सर्वांचे शिवसेनेत स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
history as the owner of sin, Uddhav Thackeray advises BJP workers
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा