विशेष प्रतिनिधी
मुंबई : नितेश राणेंच्या मेंदूचा किंवा भाजपचा तो प्रॉब्लेम आहे. हिंदू- मतदार, मुस्लिम मतदार असा भेद नितेश राणेंच्याच डोक्यात येऊ शकतो. आम्हाला फक्त बोगस मतदार हेच कळतात, जो घोळ लोकसभा विधानसभेला झाला हा एकाच वेळेला झाला आहे. नितेश राणेंनी उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, असा पलटवार मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. Raj Thackeray
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. मात्र, दुसरीकडे मतदार याद्यांमधीळ घोळ दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका न घेण्याची भूमिका विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याचा आरोप केला. .भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर हिंदू-मुस्लीम असा वाद उपस्थित केला असून त्यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे
संदीप देशपांडे म्हणाले , नितेश राणेंना आचार्य अत्रेंचं पुस्तक पाठवीन मग त्यांना रेफरन्स लागेल. राज साहेब स्वत:च्या विचारांनी चालतात इतरांच्या नाहीत. राणेंसारखे आम्ही विविध कुबड्या बदलत नाहीत. कधी काँग्रेस, कधी भाजप, आम्ही कणकवलीतही याद्या तपासणार आहोत. आधी संघावर टिका करायची मग, त्यांचीच चड्डी घालायची.
वाढवणमध्ये मराठी लोकांनाच नोकरी देणार आहेत का? आम्ही निवडणूकआयोगाला प्रश्न विचारतोय, पण राग यांना, भाजपला का येतोय. प्रश्न अदानी-अंबानी यांना विचारलं की राग यांना का येतो. या दोघांनी अंबानी-अदानींशी संबध काय? हे पहिलं स्पष्ट करावं, असा टोला देशपांडे यांनी लगावला.
नीतेश राणे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, राज ठाकरे हे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येते त्यावर लोक विचार करतात, असा आतापर्यंत अनुभव आहे. पण, कालच्या झालेल्या सभेनंतर अशा पद्धतीचे व्होट चोरीचे आरोप हे लोकसभेनंतर का झाले नाहीत? ज्या पद्धतीने लोकसभेत एका-एका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा व्होट चोरीचे, व्होट जिहादचे कोणीच आरोप केले नाहीत. जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले. पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं. तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधाळला गेला त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने हिंदुत्व विचारांचे सरकार येण्यासाठी भगव्या गुलालाने दिले.
Sandeep Deshpande Fumes at Nitesh Rane’s “Mind Problem” Remark After Criticizing Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा