विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या विरोधात भाजप नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात उपोषण सुरू केले आहे. Abdul Sattar
अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार तसेच हेराफेरी होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी तयार केलेल्या यादीत बोगस नावे इकडून तिकडे हलवण्यात आली आहेत.
भाग क्रमांक 4 मध्ये जे लोक राहात नाहीत, अशा सुमारे हजार लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये जिथे प्रत्यक्षात केवळ चारच घरे आहेत, तिथे 950 नावे दाखवण्यात आली आहेत. शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांची 200 ते 250 नावे बाहेरच्या भागात दाखवण्यात आली असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
भाजप पदाधिकारांच्या आरोपानुसार, आमदार अब्दुल सत्तार हे मागच्या निवडणुकीत मयत झालेल्या लोकांच्या मतदानावर निवडून आले आहेत. जे मेलेले लोक होते, त्यांच्या नावावर त्यांनी मतदान करून घेतले. ‘मरेल माणसावर निवडून आलेला आमदार तो म्हणजे अब्दुल सत्तार’, अशी घोषणा देखील भाजप नेत्यांनी दिली आहे.
यासंदर्भात भाजप नेत्यांनी उपोषणाच्या माध्यमातून मागण्या केल्या आहेत. मतदार यादीत समाविष्ट केलेली सर्व बोगस नावे तात्काळ वगळण्यात यावीत. सिल्लोड नगरपरिषदेत अब्दुल सत्तार यांचा गेल्या 20-25 वर्षांपासून दबाव आहे. त्यामुळे येथे आयएएस दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा. या आयएएस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडली जावी, अशा मागण्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत. तसेच सत्तार हे मित्रपक्षाचे असले तरी मतदार यादीतील हेराफेरी खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
BJP’s hunger strike against Shinde faction MLA Abdul Sattar
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा