विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : शनिवार वाड्यातील कथित नमाज पठणाच्या वादात संग्राम बापू भंडारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या, असे आव्हान दिले आहे. Aurangzeb
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य टिकवून ठेवण्यात शनिवार वाड्याचा सिंहाचा वाटा आहे. याच शनिवार वाड्यात काही महिला नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेवर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण दुर्दैव असं आहे की, पुण्यातील काही ‘हिंदू’ मंडळी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेला विरोध करत करायला सुरुवात केली आहे, असा आरोप वक्ते संग्राम बापू भांडारे यांनी केला आहे. Aurangzeb
पुढे बोलताना त्यांनी शनिवार वाड्यात कथितपणे नमाज पठणाला समर्थन देणाऱ्या पुण्यातील हिंदू व्यक्तींना भंडारे यांनी आव्हान दिले आहे. जर त्यांना शनिवार वाड्यात नमाज चालत असेल, तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ जावे. तेथे दिवा लावून हनुमान चालीसा किंवा हरिपाठ म्हणावा आणि त्याचा व्हिडिओ पाठवावा. जो कोणी हे आव्हान पूर्ण करेल, त्याला मी स्वतः 1 लाख रुपये रोख बक्षीस देईल, असे खुले आव्हान भंडारे यांनी केले. तसेच, औरंगजेबाच्या कबरीजवळ असे कृत्य करणे शक्य नाही. शनिवार वाड्यात नमाज पठण करणेदेखील स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी सांगितले. सर्व हिंदूंनी हिंदुत्वाच्या कार्यासाठी लढणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मेधा कुलकर्णी यांनी कथित नमाज पठणाच्या व्हिडीओनंतर शनिवार वाड्याच्या परिसरात आंदोलन केले होते. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आज आंदोलन करत मेधा कुलकर्णी यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच कोणी नमाजचे पठण केले म्हणजे शनिवार वाडा त्या संबंधित व्यक्तीच्या नावावर होत नाही, असा हल्लाबोल करत अक्कल नसूनही अशा महिलांना खासदार का केलं जातं? असा सवालही रुपाली ठोंबरे यांनी केला.
Light a lamp near Aurangzeb’s tomb and get a reward of one lakh rupees.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा