विशेष प्रतिनिधी
पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कोथरूड मतदारसंघात तिकीट कापल्यावर सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाची ऑफर दिली होती. पण मी दिल्या घरात सुखी असल्याचे सांगत ऑफर नाकारली असा किस्सा केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार इमारतीच्या उद्घाटनावेळी सुनील शेळके यांच्यासमोरच मोहोळ यांनी हा किस्सा सांगितला. मोहोळ म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुनील शेळकेंना भाजपने तिकीट नाकारले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच त्यांनी पहिला फोन मला केला.
ते मला म्हणाले की, माझं भाजपमधून तिकीट कट झाले, पण राष्ट्रवादीकडून मला उमेदवारी मिळाली आहे. तुझंही तिकीट कट झालंय, तू पण माझ्याबरोबर ये. त्यावर मोहोळ यांनी उत्तर दिले की, मी दिल्या घरात सुखी आहे. मी माझ्या पक्षात राहीन. तू पण विचार कर, घाई करू नकोस. मात्र शेळकेंनी त्यावर उत्तर दिले की, नाही, मी परतीचे दोर कापले आहेत, असे त्यांनी सांगितले. तो त्या पक्षात गेला आणि त्याचे भले झाले. मी माझ्या पक्षात राहिलो आणि माझंही भले झाले. आमचे नाते राजकारणापलीकडचे असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.
मुरलीधर मोहोळ आणि सुनील शेळके हे दोघेही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय चेहरे आहेत. 2019 मध्ये दोघांचेही भाजप तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून विजय मिळवला. तर मोहोळ यांनी भाजपमध्येच राहून पुण्याचे महापौरपद भूषवले आणि पुढे केंद्रीय मंत्रिपद गाठले.
https://youtu.be/A82XtPf982I
Sunil Shelke’s Offer to Join NCP Met with Muralidhar Mohol’s
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा