विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठवाडा विभागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने एकूण 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीचे वितरण दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. Marathwada region
जून ते सप्टेंबर या काळात मराठवाड्यात सलग पावसाने थैमान घातले होते. या काळात अनेक जिल्ह्यांत नदी-नाल्यांना पूर आले, घरं आणि शेतीपिकं वाहून गेली. 3 लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांचे 3 लाख 88 हजार हेक्टरवरील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. काही भागांमध्ये शेतजमीनही वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या पंधरवड्यातील हा चौथा मदतनिधीचा अध्यादेश जारी केला आहे. याअंतर्गत मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना मदत वितरित केली जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी हस्तांतरणाच्या टप्प्यांमुळे ही रक्कम दिवाळीनंतरच उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या निधीचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे चारपती संभाजीनगर जिल्ह्याला सर्वाधिक 81 कोटी 62 लाख मिळणार आहे. त्यापाठोपाठ बीड : 67 कोटी 24 लाख, जालना : 64 कोटी 75 लाख, लातूर : 35 कोटी 72 लाख, परभणी : 49 कोटी 42 लाख, नांदेड : 36 कोटी 22 लाख, हिंगोली : 11 कोटी 30 लाख असा एकूण 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा मदतनिधी मिळणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार 2 ते 3 हेक्टरपर्यंत पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तथापि, अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नुकसानीचा अंदाज जास्त असून मंजूर झालेली रक्कम अपुरी आहे. तसेच दिवाळीच्या आधी ही मदत मिळाल्यास खरीप हंगामातील नुकसानीतून बाहेर पडण्यास काहीसा आधार मिळाला असता, अशी खंतही शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, सर्व जिल्ह्यांनी आपापल्या महसूल यंत्रणेकडून शेतकऱ्यांचे तपशील आणि नुकसान अहवाल सादर केले आहेत. आता निधीचे तांत्रिक वाटप व मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. निधी वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी आणि निधी हस्तांतरणाचे अंतिम टप्पे सुरू आहेत.
Relief fund of Rs 346 crore approved for farmers affected by heavy rains in Marathwada region
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा