विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये पलटूराम अशी टीका हाेणाऱ्या मुख्यंमत्री नितीशकुमार यांचे टेन्शन माेठ्या विजयाने वाढले आहे. महागठबंधनचा दारुण पराभव हाेऊन राष्ट्रीय लाेकशाही आघाडीला प्रचंड यश मिळाले आहे. मात्र या माेठ्या विजयानेच नितीशकुमार यांचे टेन्शन वाढले आहे. Nitish Kumar
नितीश कुमार नसलेले एनडीए सरकार येऊ शकते. पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री मिळू शकेल. दुपारपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार एनडीएमध्ये भाजप ९० जागांवर, जेडीयू ७९ जागांवर, चिराग यांचा पक्ष एलजेपी(आर) २० जागांवर, मांझी यांचा पक्ष एचएएम ४ जागांवर आणि कुशवाहांचा पक्ष आरएलएम ४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना बाजुला करायचे म्हटले तरी भाजपप्रणित एनडीएकडे
भाजपच्या ९० जागा + चिरागच्या एलजेपी २० जागा + मांझी (एचएएम) च्या ४ जागा + कुशवाहा (आरएलएम) च्या ४ जागा = ११८ जागा आहेत.
बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा की जर भाजपने नितीशशिवाय सरकार स्थापन केले तर त्यांना किमान चार जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे पाच, डाव्यांचे सहा आणि बसपाचा एक आमदार एकत्र करून भाजप बहुमत मिळवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
भाजपला आता स्वतःचा मुख्यमंत्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८-१० आमदारांची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. जर भाजपने हे केले नाही तर ते केवळ युतीचा धर्म जपण्यासाठी असेल, अन्यथा नितीश कुमारांना त्यांच्यावर दबाव ठेवता येणार नाही. नितीश कुमार यांनी गेल्या वेळी भाजपबराेबर निवडणुका लढवूनही राष्ट्रीय जनता दलाशी युती केली हाेती. त्यानंतर त्या पक्षाला साेडून ते पुन्हा भाजपबराेबर गेले हाेते. त्यामुळे पलटूराम असे त्यांना म्हटले जाते.
Nitish Kumar in tension! BJP can form government, NDA will have majority even excluding Janata Dal
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















