बदलापूरमध्ये दाेन्ही ठाकरेंसाेबत काॅंग्रेस आणि शरद पवार गटाची आघाडी

बदलापूरमध्ये दाेन्ही ठाकरेंसाेबत काॅंग्रेस आणि शरद पवार गटाची आघाडी

विशेष प्रतिनिधी

ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र येणार लढणार का? मनसेला साेबत घेणार का? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मात्र, बदलापूरमध्ये महाविकास आघाडी मनसेसह एकत्र आली आहे. त्याचबराेबर भाजप वगळता इतर पक्षांनाही साेबत घेतले आहे. त्यामुळे आठ पक्षांची आघाडी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विराेधात लढणार आहे. Congress and Sharad Pawar

राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामाेडी सुरू झाल्या आहेत. 2 डिसेंबरला मतदान असल्याने सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत युतीबाबत चर्चा रंगत असताना, काही ठिकाणी स्थानिक समीकरणांनुसार स्वतंत्र पद्धतीने लढण्याचे संकेत आहेत.

बदलापुरातील ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा महाविकास आघाडीकडून झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी आणि आरपीआय (आर. के. गट), असे आठ पक्ष एकत्र येत 24 पैकी 22 प्रभागांमध्ये जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गटाची प्रिया गवळी आणि मनसेची संगीता चेंदवणकर अशी दोन नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर बदलापुरातील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असल्याने सर्व पक्षांचा वेग वाढला आहे. शिवसेना-भाजपच्या महायुतीने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी महाविकास आघाडीकडून आठ पक्षांमध्ये 45 जागांचे वाटप करून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या वाटपात शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन मुक्ती पक्षाला प्रत्येकी 11 जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 6, काँग्रेसला 5, मनसेला 3 तर वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देण्यात आल्या आहेत. आम आदमी पार्टीला 2 आणि आरपीआय आर. के. गटाला 1 जागा मिळाली आहे. बहुजन मुक्ती पक्षाला स्वतःचे चिन्ह नसतानाही 11 जागा मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या जागावाटपावर स्थानिक राजकारणात मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही दुप्पट जागा बहुजन मुक्ती पक्षाला देण्यात आल्यानं ही युती बदलापुरातील दलित आणि बहुजन मतं एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे काही राजकीय निरीक्षक म्हणतात. तर काहीजणांच्या मते या जागावाटपामुळे महायुक्तीला मोकळं रान मिळू शकतं. मविआतील नेत्यांनी मात्र आरोप फेटाळून लावत हे वाटप पूर्णतः स्थानिक ताकद आणि संघटनशक्ती पाहून करण्यात आल्याचे सांगितले आहे. या युतीमुळे बहुजन, अल्पसंख्याक आणि पारंपरिक आघाडी मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा होईल, असा विश्वास या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बदलापूर नगरपालिकेची निवडणूक नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. मुंबई महानगर प्रदेशाशी जोडलेले हे वाढते शहर असल्याने जाती-धर्म, स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, रोजगार आणि नागरी सुविधांची कमतरता असे अनेक मुद्दे मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अशा वेळी एकाच वेळी आठ पक्ष एकत्र येत लढण्याचा निर्णय हा निवडणुकीला वेगळं वळण देणारा आहे. आता आगामी काही दिवसांत महायुतीच्या उमेदवारी घोषणेमुळे आणि प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर या निवडणुकीचं समीकरण कोणत्या दिशेने झुकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल, अशा कमी कालावधीत बदलापूरमध्ये राजकीय तापमान उचांक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.

Congress and Sharad Pawar faction lead in Badlapur with both Thackerays

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023