PM Modi : महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय यंत्रणा आवश्यक, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

रायपूर : PM Modi देशात महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस दलांनी अधिक प्रभावी आणि समन्वयित प्रणाली उभी करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी डायल 112 प्रमाणे देशभर एकसमान ‘महिला सुरक्षा प्लॅटफॉर्म’ विकसित करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.PM Modi

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नवा रायपूर येथे सुरू असलेल्या 60 व्या अखिल भारतीय DGP–IG परिषदेला आज समारोप झाला. देशभरातील पोलिस महासंचालक, आयुक्त, गुप्तचर संस्था प्रमुख आणि सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारोप सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
समारोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ज्या प्रकारे डायल 112 आज आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत करते, त्याच धर्तीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक राष्ट्रव्यापी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यासाठी एक समान पद्धतीचा अवलंब करावा.”PM Modi



या परिषदेत सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, दहशतवादाच्या नव्या पद्धती, ड्रोनद्वारे होणाऱ्या तस्करीसारखी उदयोन्मुख आव्हाने यावर सखोल चर्चा झाली. पंतप्रधानांनी तंत्रज्ञानावर आधारित तपास, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, आणि ‘स्मार्ट पोलीसिंग’ या संकल्पनांना गती देण्याचे आवाहन केले.

मोदी यांनी स्पष्ट केले की, आधुनिक पोलीसिंगमध्ये कायद्याची अंमलबजावणी जितकी महत्त्वाची, तितकीच नागरिकांसोबत विश्वास निर्माण करणेही अत्यावश्यक आहे.“पोलिस दलाने नागरिकाभिमुख आणि संवेदनशील दृष्टीकोन स्वीकारल्यास समाजातील विश्वास वाढेल आणि गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवता येईल,” असे ते म्हणाले.

दरवर्षी आयोजित होणारी ही परिषद देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा रोडमॅप ठरवणाऱ्या महत्त्वाच्या व्यासपीठांपैकी एक मानली जाते. यंदाच्या परिषदेत सीमा सुरक्षा, नार्कोटिक्स नियंत्रण, महिलांचे संरक्षण, सायबर सुरक्षा, आणि तंत्रज्ञानाधारित पोलीसिंग या प्रमुख मुद्यांवर विचारमंथन झाले.

पंतप्रधान मोदींच्या सूचनांनुसार आता प्रत्येक राज्याने महिलांसाठी तत्काळ मदत-यंत्रणा उभारणे,सायबर गुन्हे तपासात तंत्रज्ञानाची गुंतवणूक वाढवणे,
प्रशिक्षण आणि आधुनिकीकरणावर भर देणे,
या दिशेने पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

Women’s Safety Needs a Unified National Platform, Says PM Modi

महत्वाच्या बातम्या