Priyanka Gandhi’ : जनतेचे प्रश्न उपस्थित करणे ड्रामा नाही, प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र माेदींना उत्तर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Priyanka Gandhi’  जनतेचे प्रश्न उपस्थित करणे, मुद्दे उपस्थित करणे ड्रामा नाही. मुद्यांच्या विषयांवर बोलण्यास परवानगी न देणं, चर्चा न करणं ड्रामा आहे. जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने चर्चा न करणे खरा ड्रामा आहे, असे प्रत्युत्तर काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले.Priyanka Gandhi’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांवर ड्रामा करण्याचे वक्तव्य केले. संसद गोंधळ करण्यासाठी नसते. ड्रामा करण्यासाठी इतर अनेक ठिकाणं आहेत. ज्यांना ड्रामा करायचा ते करतील, मात्र हे ठिकाण लोकांसाठी काम करण्याचे आहे.यावर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की, महागाई, प्रदुषण या सारख्या जनतेशी थेट संबंध असलेल्या मुद्यांपासून सत्ताधारी पळ काढत आहेत. या मुद्यांवर चर्चा नको म्हणून पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांचा खरा ड्रामा सुरु आहे.Priyanka Gandhi’



प्रियंका गांधी म्हणाल्या की, संसदेत जनतेच्या प्रश्नावर बोलणे म्हणजे ड्रामा नाही. निवडणुकीच्या काळात एसआयआर, प्रदुषण हे मुद्दे आहेत. संसद कशासाठी असते, यावरच आज चर्चा करु या!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, वास्तव असे आहे की सरकारने गेल्या ११ वर्षांपासून संसदीय शिष्टाचार आणि संसदीय व्यवस्थेला सातत्याने पायदळी तुडवले आहे आणि अशा उल्लंघनांची एक मोठी यादी आहे. सत्य हे आहे की सामान्य माणूस बेरोजगारी, महागाई, आर्थिक असमानता आणि देशाच्या मौल्यवान संसाधनांच्या लूटमारीशी झुंजत आहे, तर सत्तेत असलेले अहंकाराने ड्रामेबाजी करत आहेत.

Raising people’s questions is not drama, Priyanka Gandhi’s reply to Prime Minister Narendra Modi

महत्वाच्या बातम्या