Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ajit Pawar नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वृक्षतोडीला विरोध केला आहे.



तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष तोडीचा वाद दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे, त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33 वर्षासाठी इथली जागा खाजगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नाशिककर आक्रमक झाले असून त्यांनी सरकारविरोधात लढा उभारला आहे. Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी झाडे कापाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे. याप्रकरणी आता अजित पवार यांनी देखील तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करत सयाजी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

अजित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे मत मांडत अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल 1800 झाडे तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण, तपोवनातील झाडे ही नाशिककरांचा श्वास आहेत, या भूमिकेतून नाशिकरांनी “तपोवन वाचवा, नाशिक वाचवा” अशी हाक दिली आहे. नाशिककरांनी तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिककरांच्या या लढ्यात अभनेते तथा सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी देखील पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे. सयाजी शिंदे यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रातील सर्व लोकांना सांगतो की, तपोवनातील झाडे तोडू देऊ नका. कारण झाडे म्हणजे आपले आई-बाप आहेत. त्यामुळे आपल्या आई-बापांवर कोणी हल्ला केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत कोणालाही माफी नाही. मला कळले की, सरकार या ठिकाणी मोठे एक्झिबिशन सेंटर उभे करणार आहेत. त्यासाठी 30-35 वर्षांसाठीचा करार केला जात आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी याबाबतचे मला उत्तर द्यावे. गिरीश महाजन हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांची आणि माझी काही वैयक्तिक दुष्मनी नाही, पण तपोवनातील झाडे तोडणार असाल तर दुष्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही, असा थेट इशारा सयाजी शिंदे यांनी दिला होता.

Deputy Chief Minister Ajit Pawar opposes tree felling in Tapovan

महत्वाच्या बातम्या