विशेष प्रतिनिधी
नागपूर : निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून त्यांचे निकाल फिरवण्याचे काम महायुतीचे लोक करत आहेत. घुघूस नगरपालिकेचे कोणताही विषय हायकोर्टात नसताना तिथल्या आमदारांच्या दबावाने निवडणूक आयोगाने हरामपणा करत त्या घुघूस निवडणूक थांबवली. कारण तिथे आम्ही जिंकत होतो म्हणून, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. Vijay Vadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीच्या लोकांना माहिती आहे की राज्यातील स्थानिक निवडणूक ही त्यांच्याविरोधात जात आहे. जनतेचा कौल आमच्याकडे आहे हा फिरवण्यासाठी निकाल पुढे ढकलण्यात आहे. बावनकुळे हे निवडणूकीपूर्वीच आम्ही इतक्या जागा जिकंणार असे सांगतात. हे कशाच्या आधारावर याचा अर्थ हे सर्व चोरी आणि इव्हीएमवर करत आहे.
रवी राणा यांनी बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, रवी राणा यांच्या घरी 4 ते 5 बिबटे सांभाळण्यासाठी दिले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे की तुम्ही संपूर्ण कुटुंबाने बिबट्या पोसा आणि मग इतरांना आपले अनुभव सांगा. की ते पाळीव प्राणी आहे की हिस्त्र प्राणी आहे. त्यांच्या अनुभवानंतर सत्ताधारी आमदारांना 2- दोन बिबटे द्यावे मग उरलेच तर आम्ही निर्णय घेऊ.
सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भाच्या विकासाचा मुद्दा विधानसभेत मांडला हाेता. त्याला समर्थन देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार जे बोलत आहे ती अगदी योग्य आहे. विदर्भाच्या विकासासाठी ते नेहमी आग्रही असतात. सरकारला घरचा आहेर म्हणाण्यापेक्षा त्यांनी सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले असे म्हणावे लागेल, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा फायदा झाला का नाही यांची मी माहिती घेतो. पण मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी जर सरकारने जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे. एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसींना भडकवून आपली पोळी भाजून घ्यायची. मराठा समाजातील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेले आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीनंतर दिसून येईल. ओरिजनल ओबीसींचा वाटा कुणी हिरावला हे आज सांगायची गरज नाही. त्यासाठी निवडणुकीनंतर बोलणार आहे. पण जरांगेंचे आंदोलनानंतर जर हैदराबाद गॅझेट काढूनही फायदा होत नसेल तर चूक सरकारची की जरांगे यांची याचा विचार जनता करेल. Vijay Vadettiwar
सरकारने ठरवले आहे की स्थानिक निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्रावर फार्म भरता येईल हे ठरवले आहे. त्यासाठी 6 महिन्याची मुदत दिली आहे. यामुळे आता त्यांवर बोलून काही फायदा होणार नाही. निवडणूक झाली की यावर बोलू असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सरकारने कुणाला पाठीशी घालू नये. मुंबई विधिमंडळ परिसरात जो राडा झाला होता त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत. सत्ताधारी असो की विरोधी असो कोणीपण चूक केली त्याच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. तो सुटता कामा नये त्याला अटक झाली पाहिजे. कायद्याचा धाक राहिला पाहिजे. राजकारणासाठी विधिमंडळात राडे होत असतील तर कारवाई झाली पाहिजे. सरकारने ही हिंमत दाखवली पाहिजे. ज्यांनी हे घडवून आणले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गाेपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
Vijay Vadettiwar accuses Mahayuti of trying to change the results by postponing the election by 20 days
महत्वाच्या बातम्या