विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही. ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, अशा शब्दात केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनावले.Ajit Pawar
हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार डॉ. नितिन राऊत यांनी राज्य शासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विहीत वेळेमध्ये न मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले होते की, ’42-45 हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात 5-5 लोक पी. एचडीला प्रवेश घेत आहेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे.रामदास आठवले यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की, शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही, ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, अशा शब्दात आठवले यांनी अजित पवारांना सुनावले.Ajit Pawar
आठवले म्हणाले की, कोणतेही शिक्षण कमी-जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे गैरप्रकार असतील तर कारवाई करा, पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका. विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी यावेळी दिला.
Scholarship Is Not Charity or Mercy, It Is a Constitutional Right, Says Ramdas Athawale as He Slams Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप