माणिकराव काेकाटे यांना पाेलीसांनीच पळवले, प्रकाश आंबेडकर यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

नाशिक : अटक वॉरंट जारी झाल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे गायब होणे हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी मंत्र्यालाच पळवले असेल तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचे काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिकच्या न्यायालयाने शासकीय फ्लॅट बोगस दस्तऐवजाच्या आधारावर लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर काल सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटे यांच्या विधानसभा सदस्यत्वावर पर्यायाने मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. Prakash Ambedkar



वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, माणिकराव कोकाटे यांना एक क्षणभरही मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. एखाद्या व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली की त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेचेही सदस्य राहता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत आघाडी करणार का? यावर आंबेडकर म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कन्या इंग्लंडला असते. मी त्यांना ओळखतो. त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेल्या आहेत. त्या त्यांच्या एका विषयासंदर्भात माझ्याशी चर्चा करतात. त्यामुळे त्या काल माझ्याशी त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आल्या होत्या. माझी त्यांच्याशी चर्चा झाली. माझे मीडियाला आवाहन आहे की, काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर चांगले राहील असे मी मानतो. त्यामुळे त्या सुद्धा इंग्लंडमध्ये विद्यार्थिनी आहेत. त्या पुन्हा तिकडे जाणार आहेत. माध्यमांनी या भेटीला राजकीय रंग देऊ नये अशी माझी विनंती आहे.

Manikrao Kokate was abducted by the police, alleges Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या