विशेष प्रतिनिधी
मुंबई: BMC मागील 25 वर्ष शिवसेनेने मुंबई विकून खाल्ली, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली. मुंबई महानगरपालिकेत(BMC) सत्ता स्थापन करून मुंबईकरांना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणार असल्याचे साटम यांनी म्हटले आहे.
राजीव सातव यांच्या पत्नी काॅंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश
महायुतीत 150 जागावर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले., तर उर्वरित 77 जागांवर पुढ्यच्या तीन चार दिवसात निर्णय होईल, असं साटम यांनी सांगितलं. महायुतीच्या आजच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“मंबई(BMC) कोणाच्या बापाची नाही हे सांगण्याची गरज आहे. महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे. कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचे नसून येणाऱ्या पाच वर्षात मुंबईकरांना कोण काय देणार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोण किती जागा लढते हे महत्त्वाचं नसून आम्ही महायुती म्हणून एकत्र लढत आहोत.”असं अमित साटम म्हणाले.तर उमेदवारांबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याची त्यांनी सांगितले. BMC
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोबत युतीसंदर्भात बोलताना नवाब मलिक जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करतील तोपर्यंत राष्ट्रवादीसोबत युतीचा विचार नाही. नवाब मलिक जोपर्यंत त्यांच्या आरोपातून निर्दोष मुक्त होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही. असं अमित साटम यांनी स्पष्ट केले. BMC
भाजपा आणि शिवसेना किती जागा लढवणार याविषयी बोलताना अमित साटम यांनी सावध भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेला किती जागा मिळणार याची उत्सुकता असणार आहे. शिवसेना मागील निवडणुकीमध्ये 86 जागा जिंकली होती.SHIVSENA
या 86 जागांवर शिवसेना दावा करत आहे, तर भाजप या मागणीला नकार देत असल्याचं सूत्र कडून कळतंय. शिवसेना 125 जागांसाठी आग्रही असल्याचं समजतंय तर भाजप 125 ते 130 जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय.
We will provide corruption-free administration to the Mumbai Municipal Corporation… Amit Satam
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप