Devendra Fadnavis : जे करून दाखवले आहे आणि जे मी भविष्यात करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई ; Devendra Fadnavis नगरपालिकेच्या निवडणुकीत मी अनेक सभा केल्या, पण मी कुठेही कुणावर वैयक्तिक टीका केली नाही. माझ्याकडे विकासाचा स्पष्ट कार्यक्रम आहे. मी जे करून दाखवले आहे आणि जे मी भविष्यात करणार आहे, त्यावरच मी बोलतो. कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्यासाठी आणि सकारात्मक मत मागायला मी इथे आलो आहे. तुमचं एक सकारात्मक मत या शहराला सातारा जिल्ह्यातील सर्वात आधुनिक शहर बनवू शकतं,” असेप्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Devendra Fadnavis

फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, बाळासाहेब सोळस्कर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, यांसह महायुतीचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Devendra Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “रणजितदादांकडे विकासाचे व्हिजन आहे आणि समशेरदादांना नगरपालिकेचे कामकाज उत्तम समजते, हे फलटणसाठी एक चांगले समीकरण आहे. मतदानाआधी विरोधकांकडून पुष्कळ चिखलफेक होईल, पण चिखलाने कमळाला काहीच फरक पडत नाही; उलट चिखलामध्येच कमळ अधिक डौलाने उभे राहते. तुम्ही २० तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी मी घेतो,” असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.

महिलांच्या योजनांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जोपर्यंत तुमचा हा ‘देवाभाऊ’ जिवंत आहे, तोपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना कोणीही बंद करू शकणार नाही. समशेरदादांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून फलटणमधील लाभार्थी बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शहर विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यात आपले सरकार आल्यानंतर आपण त्या योजनांना गती दिली. “शहराच्या परिवर्तनासाठी दिलेला पैसा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्षासह संपूर्ण नगरपालिका महायुतीच्या ताब्यात देणे क्रमप्राप्त आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीवरून फलटणमधील न्यायालयाच्या इमारती एकाच ठिकाणी आणण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. तसेच नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

पीडित डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री कमालीचे आक्रमक झाले. “या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे अत्यंत अशोभनीय आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आता हाती आले असून आरोपींना कडक शासन केले जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला पूर्ण मदत दिली जाईल. या प्रकरणाशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दुरान्वये संबंध नाही,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट करून विरोधकांचे आरोप खोडून काढले.

“What Has Been Delivered and What Lies Ahead”, Chief Minister Devendra Fadnavis Assures

महत्वाच्या बातम्या