Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी दाव्याने थेट शरद पवारांची उमेदवारी धोक्यात

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षात राज्यसभेच्या दोन जागांवरून सुंदोपसुंदी चालू झाली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी दोन्ही जागांवर दावा सांगितल्याने थेट शरद पवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.Aditya Thackeray

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील खासदारांचे संख्याबळ पाहता 7 पैकी 5 जागांवर सत्ताधारी महायुती आघाडीचे खासदार विजयी होतील. तर, उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार लढत होणार आहे. परंतु, या दोन्ही जागांवर आपलाच हक्क असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.Aditya Thackeray



एकीकडे यातील एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे असल्याचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र आदित्य ठाकरेंनी दोन्ही जागांवर आपलाच दावा सांगितला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत स्पष्टपणे म्हटले की, आमच्यात कोणतेही वेगवेगळे मतप्रवाह नाही. आमच्या पक्षाचे स्पष्ट मत आहे की ही जागा शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात नेते किंवा आमदार, खासदार यांना विचारले तर त्या सगळ्यांचेच मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. मी कोणतीही व्यक्ती म्हणून किंवा व्यक्तीबद्दल बोलत नाहीये. पण आम्ही पक्ष म्हणून बोलत आहोत की दोन पक्षांचाच विचार केला तर आता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कोणत्या युत्या आणि कोणत्या आघाड्या आहेत. यावर सुद्धा जरा लक्ष देणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाशी केलेल्या युतीवरून आदित्य ठाकरेंनी आपली नाराजी या माध्यमातून उघड केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काळातच शकले उडालेली महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे. राज्यसभा निवडणूक त्यासाठी उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray’s Claim Directly Puts Sharad Pawar’s Candidature at Risk

महत्वाच्या बातम्या