Rohit Pawar उगाच थातूरमातूर रिपोर्ट नको, डिटेल्स असावेत; विमान अपघाताबाबत रोहित पवारांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास पारदर्शक व्हायला हवा. या प्रकरणाचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. खुद्द माझ्याकडे जळालेल्या ‘ब्लॅक बॉक्स’चा फोटो असून तो किती प्रमाणात जळाला आहे, हे माहिती आहे. त्यामुळे सरकारने आता थातूरमातूर अहवाल देऊन वेळ मारून नेऊ नये, तर सीबीआय तपासासाठी निश्चित वेळमर्यादा आखून द्यावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली .Rohit Pawar

विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “आम्हाला या प्रकरणावर राजकारण करायचे नाही, पण एक मराठी माणूस म्हणून आणि अजित काकांचा पुतण्या म्हणून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. तपासात कोणत्याही प्रकारची लपवाछपवी होऊ नये, यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू.”Rohit Pawar



अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा

जुन्या आठवणींना उजाळा देताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांविना राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. याबाबत दु:खद भावना आहे. अधिवेशनात कसे आणि काय बोलायचे? हे समजत नाहीये. अधिवेशन काळात मी माध्यमांशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे टोमणे मला मारायचे. दादा आत येत असताना आमदारांचा घोळका त्यांच्यासोबत असायचा. एका रुबाबत ते विधानभवनात यायचे. अधिवेशनात रोज पहिला येणार आणि शेवटी जाणारा माणूस अजितदादा असायचे. असे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. अजित काकांनी अधिवेशनात कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवले आणि अधिवेशनात शिस्त कशी कसावी? कशापद्धतीने मुद्दे आणि विषय मांडले असावेत, भाषणात मध्येच कोणी काही बोलतंय का? या सर्व गोष्टींवर अजित काकांचे लक्ष असायचे. एवढा मोठा नेता आज आपल्याबरोबर नाही. त्यामुळे अधिवेशनाला येत असताना मनात दु:ख होत आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलंय की, काही झाले तरी लढत राहायचे. त्यादृष्टीकोनातून आम्ही सर्वजण लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी अधिवेशनात मुद्दे मांडत लढत राहू,.Rohit Pawar

अजितदादांनी आतापर्यंत ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आज दादा असते, तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री असते. त्यांचा १९८२ पासूनचा राजकीय प्रवास आहे. एका कारखान्यात संचालकपदापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. त्यांना अजून काही काळ मिळाला असता, तर ते मुख्यमंत्री सुद्धा बनू शकले असते, असे सांगताना रोहित पवार भावूक झाले होते..Rohit Pawar

No Vague Report, Give Detailed Findings on Plane Crash, Demands Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या