Krishnaraj Mahadik : नवनाथ बन मुख्य प्रवक्तापदी, भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Krishnaraj Mahadikभारतीय जनता पक्षाने राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहेKrishnaraj Mahadik

प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना प्रदेश पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.Krishnaraj Mahadik



मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निवडी जाहीर केल्या. सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनिल राणे आणि योगेश सागर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. चिटणीसपदी मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांची निवड करण्यात आली आहे. या पदांद्वारे संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ तर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची निवड करण्यात आली आहे.

Navnath Ban Appointed Chief Spokesperson; Krishnaraj Mahadik Named BJP Yuva Morcha President

महत्वाच्या बातम्या