विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunetra Pawar मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर बदललेल्या परिस्थितीच्या आधारे नव्याने अर्ज करण्यासाठी त्यांनी आधीचा अर्ज मागे घेतला आहे. दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भाचे आहेत.Sunetra Pawar
पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर नवीन मुद्द्यांवर आधारित अर्ज दाखल करण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तोपर्यंत नियमानुसार पुणे पोलिस त्यांना अटक करू शकतात. मात्र दिग्विजय पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भाचे असल्याने पोलिस तत्काळ कारवाई करतील की त्यांना नव्याने अटकपूर्व जामीन अर्ज करण्याची संधी देतील, हा प्रश्न आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ पवार यांना मुंढवा जमीन प्रकरणात खारगे समितीकडून दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. या समितीने केलेल्या चौकशीत जमीन खरेदी व्यवहाराशी त्यांचा थेट संबंध आढळला नसल्याचे सांगितले जात आहे.
Sunetra Pawar’s Nephew Faces Imminent Arrest
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका