विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane मी सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही, राष्ट्रवादी विचारांचे मुस्लिम आमच्यासोबत आहेत. पण ज्यांना ठोकायचं आहे, ते मला चांगलं माहिती आहे. १५ तारीख याद राखा आणि आपल्या बॅगा भरून ठेवा. १६ तारखेनंतर एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुंबईत दिसणार नाही, असा इशारा भाजप नेते व मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घुसखोरांना मुंबईबाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, “१६ जानेवारीला आम्ही विजयाचा जल्लोष करू आणि मुंबईत ‘I Love Mahadev’ म्हणणारा महापौर बसवू. त्यानंतर १७ तारखेला या जिहाद्यांसाठी डेडलाईन असेल. १७ तारखेची सकाळ ते मुंबईत पाहू शकणार नाहीत.” मालवणीत जे ‘हिरवे साप’ वळवळत आहेत, ते लवकरच कमी होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे यांनी उत्तर भारतीयांना साद घातली. “ठाकरे म्हणतात की सर्वांना मराठी आलीच पाहिजे. मी उत्तर भारतीय बांधवांना सांगेन की, जेव्हा ते तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मराठी बोलतो, पण तुम्ही आधी बेहराम पाड्यात जाऊन तिथल्या लोकांना मराठी शिकवा,” असा टोला त्यांनी लगावला.
सभेत उपस्थित असलेल्या उमेदवार प्रीती शर्मा यांना धीर देताना राणे म्हणाले, “प्रीती ताई, तू रडू नकोस, आता दुसऱ्याला रडवण्याची वेळ आली आहे. हफ्त्याची मागणी करणाऱ्यांना आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त विकासावर लक्ष द्या.” यावेळी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कामाचे कौतुक केले आणि १७ तारखेनंतर लोकांची कामे केवळ दरेकर साहेबच करू शकतील, असा दावा केला.
“पीयूष गोयल साहेब खासदार म्हणून उत्तम काम करत आहेत. मुंबईत मोठ्या संख्येने असलेल्या कोकणवासीयांची सेवा ते करत आहेत,” असे राणे म्हणाले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत नारायण राणे यांनी खासदार म्हणून कसा विकास केला आहे, याचे उदाहरण देत त्यांनी लातूर आणि कोकणच्या विकासाची तुलना केली.
Keep your bags packed… Nitesh Rane warns Rohingyas and Bangladeshis
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन