संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

सातारा: जर माझ्याकडून अनावधानाने संभाजीराजांबद्दल बदनामीकारक असे काही लिखाण झाले असेल तर ते मी नक्की सुधारेन, असे पानिपतकार व 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रसार माध्यमांनी बोलताना सांगितले. Vishwas Patil

विश्वास पाटील यांनी त्यांच्या संभाजी कादंबरीमध्ये संभाजी राजांच्या विषयी बदनामीकारक लिखाण केले आहे. त्याबद्दल माफी मागावी व त्या पुस्तकावर विक्रीसाठी बंदी घालावी, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने सातारा येथील पवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात घोषणा देत आंदोलन केले. विश्वास पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात खुलासा करून माफी मागावी व दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली होती.



याबाबत विश्वास पाटील म्हणाले, संभाजी ब्रिगेडचे आंदोलनाचा इशारा देणारे कार्यकर्ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मी वीस वर्षांपूर्वी संभाजीराजांबद्दलची कादंबरी लिहिली आहे. माझ्या त्या कादंबरीच्या काही हजारात प्रति विकल्या गेलेल्या आहेत. अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. आंदोलनकर्ते व माझ्यामध्ये चर्चा झाली आहे आणि मी त्यांना असे सांगितले आहे की आपण दोघे एकत्रित चर्चा करू आणि जर अनावधानाने माझ्या हातून काही त्यात बदनामीकारक असे लिखाण झाले असेल तर मी नक्की सुधारणा करेन व माफी देखील मागेन.

Will Correct If Defamatory Content on Sambhajiraje Is Found, Assures Vishwas Patil

महत्वाच्या बातम्या