निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या महापालिका प्रभागात तिकीट वाटपावरून नाराजी आहे. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात तणावही निर्माण झाला होता. मेधा कुलकर्णी यांनी ही नाराजी एका पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. Medha Kulkarni



पुण्यामधून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी सर्वाधिक इच्छुक असल्याचा पाहायला मिळाले. भाजप कडून तब्बल अडीच हजार लोकांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळे नाराजांची संख्या ही मोठी आहे. ही नाराजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला परवडणारी नाही. तसेच पुणे भाजपने तब्बल 45 माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे.

अशातच खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत. गुलजार यांच्या कवितेच्या ओळी कुलकर्णी यांनी आपल्या फेसबूकवर शेअर केल्या आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘कुछ कह गऐ, कुछ सह गऐ, कुछ कहते कहते रहे गऐ’ तसेच आपल्या पोस्टमध्ये निष्ठावान कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरला आहे.

Medha Kulkarni’s Cryptic Post Sparks Buzz Among Loyalists

महत्वाच्या बातम्या