मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र, पहिल्या यादीत 36 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नबाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिला असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, उद्यापासूनच या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.



त्यातच, शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याने तुतारी चिन्हावरील इच्छुकांची नाराजी झाली असून तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ठाकरे बंधूंकडूनही लवकरच पहिली यादी जाहीर होऊ शकते, कारण शिवसेना उबाठा आणि मनसेच्याही जागावाटपाचं काम अंतिम टप्प्यात असून अवघ्या काही जागांवरुन चर्चा सुरू आहे. तर, शरद पवारांची राष्ट्रवादी देखील ठाकरे बंधूंसोबत मुंबईत एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा देण्यात येणार आहेत.

दरम्यान, भाजप-शिवसेना युतीचीही बोलणीही अंतिम टप्प्यात आली असून 20 जागांवर चर्चा सुरू आहे. भाजप 128 जागा शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत झालेला आहे उर्वरित 20 जागांची चर्चा सुरू आहे व राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊन घडलेल्या विविध जागांचा तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती आहे. भाजपकडून उद्या तेजस्वी घोसाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून आणखी 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे, पुढील काही तासांत उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर होणार आहेत.

Ajit Pawar’s first list of 36 candidates for Mumbai announced; Nawab Malik’s siblings in the fray

महत्वाच्या बातम्या