विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाने केला आहे.
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट व मनसेने युतीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेची धार अधिकच धारदार केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की नाशिकमध्ये “ठाकरे बंधू एकत्र” आल्यावर ढोल पिटणारे कार्यकर्ते अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपात सामील होतात तेव्हा त्यावर संजय राऊत दुःख व्यक्त करत नैतिकतेचे प्रश्न विचारतात, हा सरत्या वर्षांतील सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल. राजकारणात कार्यकर्त्यांसमोर नैतिकतेचा आदर्श नेत्यांनीच ठेवायचा असतो. पण तो आदर्श केव्हाच उद्ध्वस्त झाला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी, उद्धव ठाकरे यांनी कोणताही वैचारिक विधीनिषेध न पाळता, क्षणार्धात भूमिका बदलत काँग्रेससोबत आघाडी केली. त्या दिवशी केवळ सत्ता-समीकरण बदलले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण सुरू झाली… आणि नैतिकता थेट रसातळाला गेली.
ज्या नेतृत्वाने स्वतः विचार, भूमिका आणि शब्द यांची किंमत शून्यावर आणली, ते आज कार्यकर्त्यांना नैतिकतेचे धडे देत आहेत… हा दुटप्पीपणाचा कळस आहे. नेतेच जर संधीसाधूपणाचे प्रतीक बनले असतील, तर कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा तरी कोणत्या तोंडाने करणार? आज जे घडते आहे ते अचानक नाही; ते 2019 मध्ये पेरलेल्या संधीसाधू राजकारणाचेच पीक आहे. नैतिकतेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्यांनी आधी गमावला आहे, त्यांनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
Uddhav Thackeray Dragged Political Morality to Its Lowest, BJP Attacks
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : अचानक बडव्यांशी हातमिळवणी कशी केली? आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना सवाल
- बेकायदेशीर ऊस गाळप प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याला ₹११ कोटींचा दंड
- मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा राजकीय खात्मा करणार, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबाेल
- जणू रशिया आणि युक्रेनची युती! ठाकरे बंधूंची खिल्ली उडवत देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांना टाेला