विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई व महाराष्ट्रावर कुणीही वाकड्या नजरेने किंवा कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचे काम प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असा हल्लाबाेल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. Udhav Thackeray
शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घाेषणा आज झाली. यावेळी बाेलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता आपण भांडत राहिलो तर मग तो जो काही संघर्ष, ते जे काही हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल. आज आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मी मागेच सांगितले होते की, एकत्र आलोत, ते एकत्र राहण्यासाठी.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसांच्या उरावर उपरे नाचायला लागले. त्यावेळी न्याय हक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्षे होतील. इतकी वर्षे व्यवस्थित केली. आज आपण परत आपण पाहत आहोत की, मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई हवी होती, त्यांचेच 2 प्रतिनिधीच आज दिल्लीत बसलेत त्यांचे मनसुबे आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश काही सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणला नव्हता. त्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला निवडून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. आम्ही आज दोघेही इथे बसलेलो आहोत. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातील पहिल्या 5 सेनापतींपैकी एक सेनापती होते. त्यांच्यासोबत माझे वडील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज यांचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे म्हणजे अख्खे ठाकरे घराणे त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत होते.
Will politically eliminate those who separate Mumbai from Maharashtra, Udhav Thackeray’s attack
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला