विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई वगळता राज्यातील महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडून त्याच्या प्रभागातील पात्र उमेदवारांना मतदान करण्यास होणारा विरोध आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेत होणारा गोंधळ आणि विलंब टाळण्यासाठी यावेळी मतदानावेळी मतदान यंत्रावरील ईएनडी बटण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. EVMs
एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला किंवा यापैकी एकही नाही मत देण्यास नकार दिल्यास मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राधिकाऱ्याने उपस्थित मतदान प्रतिनिधींसोबत नोटाचे बटण दाबून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत. मुंबई महानगरपालिका वगळता अन्य निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडणूक घेतली जाते. त्यानुसार प्रत्येक मतदाराला प्रभागाप्रमाणे चार ते पाच मते देण्याचा अधिकार आहे. या तरतुदींचा विचार करून निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणुकांकरिता विकसित केलेल्या मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे ईएनडी बटण ठेवले आहे.
आयोगाने डिसेंबर, २०२२ च्या आदेशान्वये मतदान यंत्रावरील ईएनडी बटण कशाप्रकारे वापरण्यात येईल याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार एखाद्या मतदाराने त्याच्या प्रभागात पाच उमेदवारांना मते देणे अभिप्रेत असनाही केवळ दोन उमेदवारांना मते दिल्यास जोवर ईव्हीएमवर पाच मते किवा नोटा बटण दाबले जात नाही तोवर मतदान प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. त्यामुळे मतदान केंद्राधिकाऱ्याच नोटाचे किंवा ईएनडी बटणाचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे.
END button on EVMs closed, decision to avoid confusion in voting
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत