विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील मैत्री या बंगल्याबाहेर एका कारवर आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार, असा मजकूर लिहिण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संबंधित कार आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे.Sanjay Raut
सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. सगळीकडे प्रचाराला वेग आला आहे. राजधानी मुंबईच्या महानगरपालिकेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावत आहेत. प्रचार, डावपेच, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सक्रीय झाले आहेत. ठाकरे गट आणि मनसेत युती घडवून आणण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही पक्षांच्या युतीच्या घोषणेमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये संजय राऊत बसलेले दिसून आले. असे असतानाच आता विरोधकांच्या टीकेला छातीवर झेलून जशास तसा हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या घरी मुंबई पोलीसही पोहोचले आहेत. क्षणात मोठ्या घडामोडी घडल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.Sanjay Raut
मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांचेही एक पथक तिथे पोहचले आहे. संजय राऊत यांच्या घरापुढे बॉम्ब से उडा दुंगा असे स्टिकर लावलेली गाडी आढळून आली आहे. त्यामुळेच राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. संजय राऊत यांचे घर हे भांडूपमध्ये आहेत. कारवर लावलेले स्टिकर दिसताच राऊत यांच्या निवासस्थानातील काही कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना सांगितलं. नंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच मुंबई पोलीस राऊतांच्या घरी दाखल झाले आहेत. राऊतांच्या घराच्या परिसराची आता कसून तपासणी करण्यात येत आहे. घराच्या आसपास तपासणी केली जात आहे. हे स्टिकर नेमके कोणी चिटकवले हे अद्याप समजलेले नाही. परंतु खबरदारी म्हणून राऊतांच्या घराची तसेच आसपासच्या परिसराची तपासणी केली जात आहे.
संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर कोणाचे तरी लक्ष गेले. या कारच्या काचेवर आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार असा मजकूर लिहिलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने नाहूर येथील घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी म्हणून संजय राऊत यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. राऊतांच्या बंगल्याबाहेरील कार नेमकी कोणाची आहे? ही कार कधीपासून तिथे उभी आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच कारवरील मजकूर नेमका कोणी आणि कधी लिहिला? याचा तपास घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
संजय राऊत नेहमी पत्रकार परिषद घेत असतात. सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. असे असतानाच आता राऊतांच्या घराबाहेर बॉम्बने उडवून देण्याचे स्टिकर लावलेले आढळून आले आहे. त्यामुळे आता या स्टिकरमागे नेमका काही उद्देश लपलेला आहे का? याची तपासणी केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल झाले आहे. सोबतच मुंबई पोलीसही राऊतांच्या घरी पोहोचले आहेत.
‘Bomb’ Threat Outside Sanjay Raut’s Home, Shocking Message Found on Car
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत